मंडप डेकोरेटरच्या घरातून ४४ तोळे सोने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:19 IST2019-02-24T05:19:03+5:302019-02-24T05:19:16+5:30

साखरपुडा असल्याने घरातील सर्व मंडळींनी सर्व दागिने परिधान केले होते.

Stolen 44 tole of gold from the house of the Pavilion Decorator | मंडप डेकोरेटरच्या घरातून ४४ तोळे सोने चोरीला

मंडप डेकोरेटरच्या घरातून ४४ तोळे सोने चोरीला

ठाणे : गोकुळनगर येथील मंडप डेकोरेटर दत्ता हंबीर (६२) यांच्या घरातून सुमारे ४४ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून त्यांची किंमत सव्वासात लाख रुपये इतकी आहे. तब्बल तीन महिन्यांनी दाखल झालेल्या याविषयीच्या तक्रारीत त्यांनी पुतण्या शुभम हंबीर (१९) याच्यावर दागिने चोरीचा आरोप केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.


दत्ता हंबीर (६२) यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांचा पुतण्या आकाश अरुण हंबीर (२४) याचा ११ नोव्हेंबर २०१८ रोजी साखरपुडा असल्याने त्यांच्याकडे नातेवाईक आले होते. साखरपुडा असल्याने घरातील सर्व मंडळींनी सर्व दागिने परिधान केले होते. तसेच कार्यक्रमानंतर ते दागिने काढून हॉलमधील कपाटामध्ये एका डब्यात ठेवले होते. १७ नोव्हेंबरला विवाहित मुलीचे दागिने तिला परत देण्यासाठी कपाट उघडल्यावर दागिने ठेवलेला डबा नसल्याचे निदर्शनास आले. त्या डब्याचा शोध घेऊनही मिळून न आल्याने जवळपास तीन महिन्यांनंतर दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली.


त्यामध्ये ४३.५१९ ग्रॅम वजनाचे सात लाख २६ हजार ३७५ रुपयांचे दागिने असून ते शुभम हंबीर (१९) याने चोरल्याचा संशय वर्तवल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.

Web Title: Stolen 44 tole of gold from the house of the Pavilion Decorator