ठाण्यात विदेशी मद्याचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:01 PM2019-03-07T18:01:25+5:302019-03-07T18:03:23+5:30

52 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने बुधवारी जप्त केला आहे. 

The stock of foreign liquor was seized in Thane | ठाण्यात विदेशी मद्याचा साठा जप्त

ठाण्यात विदेशी मद्याचा साठा जप्त

Next
ठळक मुद्दे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा साठा विक्रीस आणला असल्याची शक्यता मद्याच्या साठयासह चारचाकी वाहन, एक ट्रक जप्त करण्यात आला असून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे

ठाणे - राज्यात बंदी असलेल्या बॉम्बे स्पेशल व्हीस्कीचे ४०० बॉक्स या विदेशी मद्यासह वाहन असा दारुबंदी गुन्ह्याखाली 52 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने बुधवारी जप्त केला आहे. 

या करवाईत मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ शहापुर खर्डी येथे मध्यप्रदेश येथून विक्रीस आणण्यात आलेला मद्याच्या साठयासह चारचाकी वाहन, एक ट्रक जप्त करण्यात आला असून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा साठा विक्रीस आणला असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने दिली.

Web Title: The stock of foreign liquor was seized in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.