बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 16:42 IST2020-05-23T16:36:14+5:302020-05-23T16:42:58+5:30

या महिलेला पहिल्या नवऱ्याची तीन मुले आहेत. हे लोक खेड्यातील भाड्याच्या घरात राहतात.

Spot on father and daughter relation; The stepfather raped the minor girl pda | बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ठळक मुद्देसायंकाळी उशिरा अल्पवयीन मुलीने धनौरी पोलिस चौकी गाठली आणि आपली आई खेड्यात कामावर गेली होतीधनौरी चौकी प्रभारी यशवंत खत्री यांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून आरोप पित्याला अटक केली आहे.

सावत्र वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनौरी परिसरातील एका गावात बिहारमधील एका महिलेने मेरठमधील एका माणसाशी दुसरे लग्न केले होते. या महिलेला पहिल्या नवऱ्याची तीन मुले आहेत. हे लोक खेड्यातील भाड्याच्या घरात राहतात.

सायंकाळी उशिरा अल्पवयीन मुलीने धनौरी पोलिस चौकी गाठली आणि आपली आई खेड्यात कामावर गेली होती व ती घरी एकटी असताना सावत्र बापाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत तक्रार दिली. घरात तिला एकटी असल्याचं पाहून तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. तक्रारीमध्ये अल्पवयीन मुलीने असा आरोप केला आहे की, यापूर्वीही सावत्र पिताने तिच्यावर बलात्कार केला होता, परंतु भीतीपोटी ती शांत राहिली. सावत्र वडील मारण्याची धमकी देत असत. धनौरी चौकी प्रभारी यशवंत खत्री यांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून आरोप पित्याला अटक केली आहे.

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

Web Title: Spot on father and daughter relation; The stepfather raped the minor girl pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.