शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं, रेल्वेच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 21:35 IST

तीन दिवसानंतर पटली ओळख : मृत तरुण खामगावचा

ठळक मुद्देतरुण सोनी हा विद्यार्थी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलाचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला.

जळगाव - सिग्नल मिळत नसल्याने एक्सप्रेस गाडी आऊटरवर थांबली, त्यामुळे  खाली उतरुन मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या तरुण विनोद सोनी (२२, रा. किसन नगर, खामगाव, जि.बुलडाणा) या विद्यार्थ्याला दुसऱ्या रुळावरुन आलेल्या गोदान एक्सप्रेसचा धक्का लागल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुसखेडाजवळ घडली. सोमवारी या विद्यार्थ्याची ओळख पटली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण सोनी हा विद्यार्थी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. २९ रोजी हिसार एक्सप्रेसने पुणे येथे जात असवताना सिग्नल न मिळाल्याने ही गाडी दुसखेडा शिवारात खांब क्र.४५०/३२/३१ जवळ थांबली. त्यामुळे तरुण हा गाडीच्या खाली उतरुन मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असताना दुसऱ्या रुळावरुन भरधाव वेगाने आलेल्या गोदान एक्सप्रेसचा तरुणला धक्का बसला. त्यात तो जागीच ठार झाला.  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलाचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला. तेव्हा त्याची ओळख पटलेली नव्हती. 

पोलिसांची धडपळ आणि बॅँक अधिकाऱ्याचे सहकार्यलोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बाबुलाल खरात तसेच कॉ.नीलेश कुसराम यांनी मयताची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड तसेच पॅन कार्ड मिळाले. पॅन कार्डावरून त्याची ओळख पटली नाही. सोमवारी पोलिसांनी भुसावळ येथे बॅँक ऑफ बडोदा शाखेत धाव घेतली. व्यवस्थापकाला एटीएम कार्ड देऊन या तरूणाचा पत्ता शोधण्याची विनंती केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संगणकावर तपासले असता तरुण विनोद सोनी असे त्या मुलाचे नाव व तो खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. 

एकुलता मुलगा गेल्याने प्रचंड आक्रोशलोहमार्ग पोलिसांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तरूण याच्या अपघाताची व त्याच्या घराचा पत्ता सांगितला. तेथील पोलिसांनी सोनी याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानुसार दुपारी नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठले. मुलाचा मृतदेह पाहताच कुटुंबाने एकच आक्रोश केला. तरूण हा कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडिल व बहिण (१६) असा परिवार आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी नातेवाईक मृतदेह घेऊन खामगावकडे रवाना झाले.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेStudentविद्यार्थीDeathमृत्यूMobileमोबाइल