सराईत सोनसाखळी चोरांकडून 16 तोळे दागिने जप्त; ६ गुन्ह्यांची उकल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 21:04 IST2018-11-07T21:04:39+5:302018-11-07T21:04:54+5:30

आरोपीकडून 16 तोळे सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. शम्स अली सय्यद (वय 21) असं या आरोपीचे नाव आहे.  

Sonechakhali thieves seized 16 gold jewelry; 6 offenses | सराईत सोनसाखळी चोरांकडून 16 तोळे दागिने जप्त; ६ गुन्ह्यांची उकल 

सराईत सोनसाखळी चोरांकडून 16 तोळे दागिने जप्त; ६ गुन्ह्यांची उकल 

मीरारोड - काशिमीरा पोलिसांनी एका सराईत सोनसाखळी चोराला अटक केली असून शहरातील ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपीकडून 16 तोळे सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. शम्स अली सय्यद (वय 21) असं या आरोपीचे नाव आहे.  

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सोनसाखळीच्या चोरीच्या गुन्ह्यांप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दत्तूसाहेब लोंढे सह पवार , सुतार ,  केंद्रे , मोरे , पाटील ,रोकडे यांचे पथक तपास करत होते. पोलिसांना नंबर प्लेट तुटलेली एक दुचाकी संशयास्पदरित्या आढळून आली. या आधी सोनसाखळीच्या गुन्ह्यात सीसीटीव्हीमध्ये या प्रकारची दुचाकी असल्याचे पोलिसांनी हेरले. यावरून पोलिसांनी पाळत ठेऊन शम्स अली सय्यद (वय 21) रा . पूनम क्लस्टर , मीरारोड याला ताब्यात घेतले. 
त्याची कसून चौकशी केली असता शम्स याने काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत 3 , मीरारोड हद्दीत 1 व नया नगर हद्दीत 2 असे एकूण सहा सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक करून दुचाकी व 16 तोळे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत 

Web Title: Sonechakhali thieves seized 16 gold jewelry; 6 offenses