Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:45 IST2025-06-14T13:43:46+5:302025-06-14T13:45:49+5:30
Sonam Raghuwanshi Latest News: सोनम रघुवंशी राजा रघुवंशीच्या हत्येनंतर मेघालयातून फरार झाली आणि गाजीपूरमध्ये मिळाली. मेघालयातून फरार झाल्यानंतर ती इंदौरमध्येच येऊन राहत होती. ते ठिकाणं कोणतं होतं?

Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
Sonam Raghuwanshi News Story: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम रघुवंशीबद्दल एका आरोपीने नवीन खुलासा केला आहे. राजाच्या हत्येनंतर सोनम मेघालयातून फरार झाली होती. तेव्हापासून ती इंदूरमध्येच राहत होती. हा फ्लॅट कुणी भाड्याने घेतला होता आणि काय घडलं याबद्दल पोलिसांच्या तपासातून माहिती उजेडात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजा रघुवंशी प्रकरणातील आरोपी विशाल चौहान यांने ३० मे रोजी त्याच्या घरापासून पाच किमी अंतरावरच इंदूरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तसा भाडे करार करण्यात आला. स्वतःची ओळख इंटेरिअर डिझायनर अशी सांगून त्याने हा फ्लॅट घेतला होता.
राजाच्या हत्येनंतर सोनम आली इंदूरमध्ये
मेघालयातील शिलाँगमध्ये राजाची हत्या केल्यानंतर सोनम फरार झाली. तिने इंदूर गाठले. त्यानंतर ती विशालने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होती. या फ्लॅटचे भाडे १६००० रुपये होते. सोनम इंदूरमध्ये राहत असतानाच या प्रकरणात पोलिसांनी आकाश नावाच्या आरोपीला अटक केली.
आकाशला अटक होताच सोनम फ्लॅटमधून फरार जाली. ७-८ जूनच्या रात्री सोनम इंदूरवरून उत्तर प्रदेशात पोहोचली. महत्त्वाचे म्हणजे इंदूरमधून उत्तर प्रदेशला जाताना तिने बुरखा घातला होता.
राजच्या सांगण्यावरून सोनम गेली उत्तर प्रदेशात
पोलिसांनी आकाशला अटक केली. त्यानंतर सोनमचा प्रियकर राज याने तिला इंदूरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार राजनेच तिला उत्तर प्रदेशात जाण्यास सांगितले आणि तिथे गेल्यानंतर तिच्या भावाला कॉल करायला सांगितले. कॉल करून भावाला सांग की माझे अपहरण करण्यात आले होते, असं राज सोनमला म्हणाला होता.
सोनम राहत होती तो फ्लॅट इंदूरमध्ये कुठे होता?
विशाल चौहानने सोनमला राहण्यासाठी जो फ्लॅट भाड्याने घेतला होता, तो इंदूरमधील देवास नाका परिसरात आहे. चौहानने दोन महिन्यांचे डिपॉझिट म्हणून ३४००० हजार रुपये दिले होते.