Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:23 IST2025-06-11T15:22:30+5:302025-06-11T15:23:05+5:30

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सोनम आणि राज खूप आनंदी दिसत आहेत, ज्यावरून असं दिसून येतं की दोघांमध्ये फक्त मैत्रीपूर्ण संबंध नव्हते.

Sonam Raghuvanshi lover raj kushwaha exclusive photo selfie from the hotel | Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सोनम आणि राज खूप आनंदी दिसत आहेत, ज्यावरून असं दिसून येतं की दोघांमध्ये फक्त मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. आतापर्यंत राजचे मित्र आणि ओळखीचे लोक असा दावा करत होते की राज सोनमला 'दीदी' म्हणायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो हत्येपूर्वीचा आहे. मेघालय पोलीस आणि इंदूर गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात असं दिसून आलं आहे की, हत्येच्या काही दिवस आधी सोनम आणि राज इंदूरमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकत्र वेळ घालवत होते.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान मेघालय पोलिसांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं, त्यांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांना समोरासमोर आणलं. यामध्ये पोलिसांकडे उपलब्ध असलेले ठोस पुरावे दाखवताच आणि प्रश्न विचारताच सोनमने सर्वच खरं सांगून टाकलं. शिलाँग पोलिसांनी घटनेनंतर सोनमच्या मारेकऱ्यांशी झालेल्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले, याशिवाय घटनास्थळी सापडलेल्या सोनमच्या शर्टचा फोटोही दाखवण्यात आला. त्यानंतर सोनम रघुवंशीने एसआयटीसमोर कबूल केलं की तिनेच राजाला मारलं. 

"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद रघुवंशी आज दुपारी इंदूर येथील राजाच्या घरी पोहोचला. गोविंदने माध्यमांसमोर स्पष्टपणे सांगितलं की, ज्याने ही हत्या केली आहे त्याला फाशी देण्यात यावी. गोविंदने दावा केला की त्याला सोनमच्या कोणत्याही कटाची माहिती नव्हती. अन्यथा आम्ही ही हत्या होऊ दिली नसती. त्याने सांगितलं की, त्याची सोनमशी गाझीपूरमध्ये फक्त दोन मिनिटं भेट झाली होती आणि त्या दरम्यान सोनमने कोणताही गुन्हा कबूल केला नाही.

राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

गोविंदने सोनमचे राज कुशवाहासोबतचं नातं पूर्णपणे नाकारलं आणि म्हटलं की, तो आमच्याकडे फक्त एक कर्मचारी होता, सोनम त्याला राखी बांधायची. मला त्यांच्या अफेअरबद्दल माहिती नाही. सोनमने तिच्या आईलाही याबाबत सांगितलं नाही. पंडितांनी मुहूर्त ठरवल्यामुळे लग्न लवकर झालं असं देखील भावाने म्हटलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 
 

Web Title: Sonam Raghuvanshi lover raj kushwaha exclusive photo selfie from the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.