Sonali Phogat Murder: सोनालीचा पीए सुधीर सांगवान कोण? बायको शिक्षिका, घरच्यांनी संबंध तोडलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 15:31 IST2022-08-27T15:31:05+5:302022-08-27T15:31:43+5:30
Who is Sudhir Sangwan: सोनालीसोबत गेल्या काही दिवसांपासून एक नाव समोर येत आहे, ते सुधीरचे. हा सुधीर कोण? तो तिचा पीए कधी आणि कसा बनला.

Sonali Phogat Murder: सोनालीचा पीए सुधीर सांगवान कोण? बायको शिक्षिका, घरच्यांनी संबंध तोडलेले
भाजपा नेता सोनाली फोगाट हिच्या मृत्यूमागे तिचा पीए सुधीर सांगवान याचा मुख्य हात आहे. यामुळे त्याला आणि तिचा कथित मित्र सुखविंदर वासी य़ाला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्या दिवशीचा हार्ट अटॅक आल्याचा दावा आता हत्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सोनालीच्या भावाने बलात्कार, लैगिक शोषण, ड्रग्ज आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता, यानंतर या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी देखील कसून तपास सुरु केला आहे.
सोनालीसोबत गेल्या काही दिवसांपासून एक नाव समोर येत आहे, ते सुधीरचे. हा सुधीर कोण? तो तिचा पीए कधी आणि कसा बनला. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान सुधीर सांगवान सोनालीला भेटला. नंतर सुखविंदरनेही सोनालीसोबत काम केले. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सोनाली फोगटसोबत सुधीर सांगवानही अनेकदा दिसत आहे. एवढेच नाही तर जेव्हा सोनाली बिग बॉसमध्ये सहभागी झाली तेव्हा सुधीरने तिला बाहेरून खूप सपोर्ट केला होता.
या सुधीर सांगवानबाबत अधिक माहिती मिळत नसली तरी, तो मुळचा हरियाणाच्या गोहानाच्या खेडा गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी सरकारी शिक्षिका आहे. काही कारणांमुळे त्याचे घरातील लोक त्याच्याशी संपर्कात नाहीत. सुधीर हा २०१५-१६ मध्येच रोहतकला शिफ्ट झाला होता. त्याने सेक्टर २ मध्ये एक घर भाड्याने घेतले होते. परंतू, त्याचे वागणे चांगले नसल्याने घर मालकाने त्याला हाकलले होते. २०१९ ला तो सोनालीच्या संपर्कात आला, त्यापूर्वी तो मधल्या काळात काय करत होता, ते समजू शकलेले नाही.
सुखविंदर हा सोनालीचा मित्र असल्याचे म्हटले जात आहे. परंतू, तो सुधीरद्वारेच सोनालीला भेटला होता. सुखविंदर हा हरियाणाच्या चरखीदादरी जिल्ह्यातील मंडोला गावातील आहे. त्यापेक्षा मोठी बाब म्हणजे सुखविंदरने हरियाणाचे वादग्रस्त आमदार गोपाल कांडांकडे काम केलेले आहे.