शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

जावयाने कोयत्याने केली सासूसह मेव्हणीची हत्या, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 18:42 IST

Double Murder Case : निर्मलाबाई भिकाजी पवार (वय ६५) रा शेलुबाजार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे (वय ४०) रा जिंतूर जि परभणी, अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.

मंगरुळपीर : संपत्तीच्या वादातून जावयाने सासू व मेव्हणीची कोयत्याने हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना शुक्रवार १३ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे घडली आहे. निर्मलाबाई भिकाजी पवार (वय ६५) रा शेलुबाजार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे (वय ४०) रा जिंतूर जि परभणी, अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार शुक्रवार १३ मे रोजी सकाळी आरोपी सचिन धर्मराज थोरात (वय ४२) ,रा जनता वसाहत पुणे याचा सकाळच्या सुमारास सासू निर्मलाबाई भिकाजी पवार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे यांच्याशी संपत्तीवरून वाद झाला. वाद वाढत गेल्याने आरोपी सचिन धर्मराज थोरात याने सासू निर्मलाबाई भिकाजी पवार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार सुनील हुड यांचे मार्गदर्शनात एपीआय मंजुषा मोरे, एएसआय अनिरुद्ध भगत, हेकॉ ज्ञानेश्वर राठोड,पोकॉ संदिप खडसे,गोपाल कव्हर, अंकूश मस्के यांनी घटनास्थळ गाठून आरोपीस अटक केली, तसेच आरोपीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मंजुषा मोरे करीत आहेत. 

चालक, डॉक्टरानेच त्यांना टाकले रुग्णवाहिकेतशेलूबाजार येथे सकाळच्या सुमारास जावयाने सासू आणि मेव्हणीवर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी परिसरात शुकशुकाट आणि स्मशान शांतता पसरली होती. त्यामुळे रुग्णवाहिका चालक राहुल खिल्लारे आणि डॉक्टर मिलिंद चव्हाण यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निर्मला पवार व मेव्हणी विजया गुंजावळे यांना उचलून रुग्णवाहिकेत टाकत वाशिम येथे आणले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDomestic Violenceघरगुती हिंसाFamilyपरिवार