वाढदिवस साजरा करण्यासाठी विकली बकरी; आई रागावली म्हणून डोक्यावर मारला हातोडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 10:03 IST2022-09-03T10:02:25+5:302022-09-03T10:03:09+5:30

Son Killed Mother : आईने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बकरी विकल्याप्रकरणी जाब विचारला होता. याचा राग आल्याने मुलाने आईची हत्या करून पळ काढला.

son hits mother with hammer she protested against selling goat for birthday party jhalawar | वाढदिवस साजरा करण्यासाठी विकली बकरी; आई रागावली म्हणून डोक्यावर मारला हातोडा 

वाढदिवस साजरा करण्यासाठी विकली बकरी; आई रागावली म्हणून डोक्यावर मारला हातोडा 

राजस्थानच्या (Rajasthan) झालावाड (Jhalawar) जिल्ह्यातील सुनेल पोलीस स्टेशन हद्दीतील सेमालिया गावात एका मुलाने आपल्याच आईच्या डोक्यात हातोडा मारून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. आईने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बकरी विकल्याप्रकरणी जाब विचारला होता. याचा राग आल्याने मुलाने आईची हत्या करून पळ काढला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या संपूर्ण घटनेबाबत मृत नोध्यानबाई मेघवाल यांच्या भावाने सांगितले की, गुरुवारी भाचा सूरजचा वाढदिवस होता. त्यामुळे सूरजला त्याच्या मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करायची होती, पण पैसे नव्हते. त्यानंतर घरातील एक बकरी विकली आणि मित्रांसोबत पार्टी केली. यानंतर आई घरी पोहोचली आणि वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे कुठून आणले, असे विचारले असता सूरजने बकरी विकल्याचे सांगितले. त्यावर आई चिडली आणि सूरजवर रागवली. 

या वादाच्या रागातून सूरजने आई नोध्यानबाई यांच्यावर हातोड्याने वार केले आणि घराबाहेर गेला. काही वेळाने तो पुन्हा घरी गेला आणि आईचा मृतदेह पेटीत टाकून पळून गेला, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवागारात ठेवला असून तेथे वैद्यकीय बोर्डाकडून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दुसरीकडे, पोलीस आरोपी मुलगा सूरज मेघवालचा शोध घेत आहेत.

दुसरीकडे, पोलीस अधिकारी दिनेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, मुलाने आईवर धारदार वस्तूने हल्ला केला, ज्यामुळे डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. यानंतर मुलाने मृतदेह एका पेटीत लपवून ठेवला. सायंकाळी मुलाचे वडील कामावरून घरी पोहोचल्यावर त्यांनी पत्नीबाबत विचारणा केली असता, मुलाने आई शेतात गेल्याचे सांगितले. तसेच, आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे वय अद्याप निश्चित झालेले नाही, असे ते म्हणाले.

Web Title: son hits mother with hammer she protested against selling goat for birthday party jhalawar