आईचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पोटच्या मुलाने तिच्या हत्येची दिली सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 21:51 IST2019-10-11T21:47:15+5:302019-10-11T21:51:29+5:30
या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आईचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पोटच्या मुलाने तिच्या हत्येची दिली सुपारी
नवी दिल्ली - पोलिसांनी एका तरुणाला आपल्या आईच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं आहे. स्वत:च्या जन्मदात्या आईची हत्या करण्यासाठी मुलाने तीन अल्पवयीन मुलांसह आणखी तीन लोकांना सुपारी दिली होती. 22 वर्षीय अंश ढींगरा याने राजेंद्र आणि राहुल यांना घरात चोरी करून आपल्या आईची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी अंशचे त्याच्या आईशी वारंवार खटके उडत असत. आपल्या आईचे बाहेर दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय अंशला होता आणि त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे. आईचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मुलगा अंश सतत आईशी भांडण करत असे. त्यामुळे त्याला आईचा राग यायचा आणि याच रागातून त्याने आईला जीवे मारण्याची सुपारी दिली. 6 ऑक्टोबरला तीन जणांनी अंशच्या घरात प्रवेश केला आणि घर लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्ये येणाऱ्या आईला त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना त्यांनी अंशला ताब्यात घेतले. त्यातूनच गुन्ह्याचा उलगडा झाला.