Solapur News: सोलापूर: विमानसेवेच्या आंदोलकांना धर्मराज काडादींनी पिस्तुल दाखवत धमकावले; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 20:45 IST2022-11-26T20:43:58+5:302022-11-26T20:45:45+5:30
आंदोलक दिवसभराचे आंदोलन संपवून दुसऱ्या दिवशीच्या नियोजनाची चर्चा करत होते. तेव्हा धर्मराज काडादी तिथे आले आणि गोळी घालण्याची धमकी दिल्याचा आरोप.

Solapur News: सोलापूर: विमानसेवेच्या आंदोलकांना धर्मराज काडादींनी पिस्तुल दाखवत धमकावले; Video व्हायरल
गेल्या २१ दिवसांपासून सोलापूरमध्ये विमानसेवा सुरु करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांना सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पिस्तुल दाखवून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आंदोलक दिवसभराचे आंदोलन संपवून दुसऱ्या दिवशीच्या नियोजनाची चर्चा करत होते. तेव्हा धर्मराज काडादी तिथे आले. यावेळी केतन शहा यांना त्यांनी काय रे मस्ती आली का? असे विचारले. यावर शहा यांनी त्यांना नाही साहेब, काय झाले असे विचारले असता तू माझी बदनामी करत आहेस, गुन्हेगार म्हटले आहे, असे काडादी यांनी म्हटले.
यावर शहा यांनी त्यांना मी तुमचे नाव घेतलेले नाही. आयुक्त तेली मॅडम गुन्हेगारासोबत गेले असे म्हटले होते. मॅडम तुम्ही नवीन आलात, त्यामुळे तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगायला हवे होते. २०१७ साली महापालिकेचे अधिकारी तिथे गेलेले असताना अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. गडादी ९ नंबरचे आरोपी होते, असे शहा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
सोलापूरात विमानतळासाठीच्या आंदोलकांना पिस्तुल दाखवून गोळी मारण्याची धमकी... #Solapur#CrimeNews#Maharashtrahttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/8tQL2PNegx
— Lokmat (@lokmat) November 26, 2022
नाव घेतलेले नाही असे म्हणताच, तुला गोळी घालेन असे काडादी म्हणाले. यावर शहा यांनी मला माहिती आहे, तुमच्याकडे लायसन्सची रिव्हॉल्व्हर आहे. तुम्ही आताही गोळी घालू शकता, असे म्हटले. यावर काडादी यांनी आताही पिस्तुल आणलीय, असे म्हणत चंदेरी रंगाची पिस्तुल दाखविली, असे शहा यांनी सांगितले. मी म्हणालो, तुम्ही आताही गोळी घालू शकता, परंतू हे योग्य नाही, असे मी म्हटल्याचे आंदोलक शहा यांनी सांगितले. तसेच पोलिसांना याबाबत कळविले असल्याचेही केतन शहा म्हणाले.