...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; चाकू घेऊन तो ठाण्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 08:47 IST2021-08-02T08:47:00+5:302021-08-02T08:47:53+5:30

Crime News: पत्नी शबाना (४०) हिची हत्या करून, पती समीर (४५) हा रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक झाली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

... so he murdered his wife; He took a knife and entered the police station | ...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; चाकू घेऊन तो ठाण्यात दाखल

...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; चाकू घेऊन तो ठाण्यात दाखल

 नवी दिल्ली : पत्नी शबाना (४०) हिची हत्या करून, पती समीर (४५) हा रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक झाली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना येथील मंगोलपुरी भागात शनिवारी घडली. हल्ला झाल्यावर शबानाला शेजारच्यांनी संजय गांधी रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत जाहीर केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पत्नीशी समीरचे जोरदार भांडण झाल्यावर त्याने तिच्यावर हल्ला केला. या जोडप्याच्या घराला लागून असलेल्या दुकानात शबाना गंभीर जखमी अवस्थेत पडली होती. चौकशीत समीरने मी बेरोजगार असल्याचे व दारू पिण्याच्या सवयीमुळे शबानाशी वारंवार भांडणे होत असल्याचे सांगितले. साधारण महिन्याभरापूर्वी शबानाने समीरला घराबाहेर हाकलून दिले होते व तेव्हापासून तो रस्त्यावर राहात होता.

का केली हत्या?
- रस्त्यावर राहण्याची वेळ 
शबानामुळेच आल्याचा समज करून, घेऊन समीरने सूड म्हणून तिची हत्या केली. 
-या जोडप्याला २१ व १७ वर्षांची मुले आहेत. पोलिसांनी त्या दोघांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे.

Web Title: ... so he murdered his wife; He took a knife and entered the police station