...म्हणून सासरच्या मंडळींनी जावयाचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:51 IST2018-11-13T17:51:23+5:302018-11-13T17:51:45+5:30
मुंबई - सांताक्रुज पूर्व येथील गावदेवी परिसरातील मदर तेरेसा चाळीत आपल्या मुलांना भेटायला आलेल्या श्रीधर हरिजन (वय ३३) याची सासरच्या ...

...म्हणून सासरच्या मंडळींनी जावयाचा घेतला जीव
मुंबई - सांताक्रुज पूर्व येथील गावदेवी परिसरातील मदर तेरेसा चाळीत आपल्या मुलांना भेटायला आलेल्या श्रीधर हरिजन (वय ३३) याची सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरच्या सर्व मंडळींना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत श्रीधर हरिजनचे राजेश्वरी हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये सतत भांडण होत असे. तीन महिन्यांपूर्वी राजेश्वरी शेजारच्याच परिसरात राहणाऱ्या आई वडिलांकडे मुलांना घेऊन राहण्यास गेली. राजेश्वरीने १४ वर्षांचा मुलगा आणि १३ व ५ वर्षाच्या मुलीला देखील आपल्यासोबत नेले होते. श्रीधर रविवारीच आपल्या गावाहून म्हणजे तामिळनाडू येथून मुंबईत आला. त्यानंतर सोमवारी तो सासुरवाडीला आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी श्रीधरला मुलांना भेटू देण्यास सासरच्या मंडळींनी मनाई केली होती. त्यानंतर श्रीधरचे सासू, सासरे, भाचा आणि मेहुण्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईच्या हुकाने श्रीधरला या चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच मेहुण्याने चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्याचा जीव घेतला. त्यानंतर श्रीधरला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखलपुर्व त्याला मृत घोषित करण्यात आले. वाकोला पोलीस ठाण्यात याबाबत भा. दं. वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली.