शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Ahmednagar : ३७ कोटींच्या विमा रकमेसाठी सर्पदंशाने मनोरुग्णाला मारले, नगर जिल्ह्यातील घटना; स्वत:ला मृत दाखविण्यासाठी बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 6:15 AM

Ahmednagar : कोले तालुक्यातील राजूर येथे २२ एप्रिल २०२१ रोजी ही घटना घडली होती. या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

- अरुण वाघमोडे

अहमदनगर : अमेरिकेतील वास्तव्यात विमा कंपनीकडून उतरविलेल्या ३७ कोटी रुपयांच्या (५० लाख डॉलर) विम्याची रक्कम मिळविण्यासाठी येथील एका व्यक्तीने स्वत:ला मृत दाखविण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीला सर्पदंश करून ठार मारले. मात्र पोलीस आणि विमा कंपनीच्या चौकशीत विमा धारक व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले. अकोले तालुक्यातील राजूर येथे २२ एप्रिल २०२१ रोजी ही घटना घडली होती. या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

मुख्य आरोपी प्रशांत रामहरी चौधरी याच्यासह प्रभाकर भिमाजी वाघचौरे, संदीप तळेकर, हर्षद रघुनाथ लहामगे, हरिश रामनाथ कुलाळ यांना अटक केली आहे. वाघचौरे २० वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. तेथे तो हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करत होता. जानेवारी २०२१ मध्ये तो भारतात आला. त्यानंतर तो  अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथे त्याच्या सासुरवाडीला राहत होता. अमेरिकेत असताना वाघचौरे याने ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीचा ३७ कोटी ५७ लाख रुपयांचा जीवन विमा उतरविला होता.

विम्याचे पैसे मिळविण्यासाठी त्याने त्याचे नातेवाईक संदीप तळेकर आणि प्रशांत चौधरी यांना विश्वासात घेऊन सात महिन्यांपूर्वी कट रचला. ठरल्याप्रमाणे वाघचौरे आणि त्याच्या साथीदारांनी धामणगाव आवारी येथील मनोरुग्ण नवनाथ यशवंत आनप (५०) यास २२ एप्रिलला राजूर परिसरात आणून सर्पदंश केला. आनप हे मृत झाल्यानंतर त्यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांचे शवविच्छेदन करून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. राजूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर विम्याचा दावा दाखल केला होता. 

असा रचला कट... कोब्राने केला सर्पदंश वाघचौरे याने राजूर येथे एक खोली भाड्याने घेतली. त्याचा साथीदार हर्षद लहामगे याने सर्पदंश करण्यासाठी सापाचे खेळ करणाऱ्यांकडून कोब्रा जातीचा विषारी नाग मिळविला. प्रशांत चौधरी याने नवनाथ आनप या मनोरुग्णाचा शोध घेतला. त्यानंतर हर्षद लहामगे व हरिश कुलाळ यांनी नवनाथला खोलीपासून दूर नेऊन त्याच्या उजव्या पायाला सापाचा चावा दिला. त्यानंतर आरोपींनी मृत व्यक्ती प्रभाकर वाघचौरे असल्याचे दाखवून पुढील प्रक्रिया केली. 

अशी उघडकीस आली घटना वाघचौरे हा अमेरिकेत असताना त्याने स्वत:सह त्याच्या पत्नीच्या नावाने विमा उतरविला होता. २०१७ मध्ये पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचे खोटे कागदपत्रे सादर करून त्याने दावा केला होता. मात्र त्याचा खोटारडेपणा समोर आला होता. त्यानंतर वाघचौरेने पुन्हा दावा केल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आला. चौकशी  अधिकारी पंकज गुप्ता यांनी राजूर पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर चौकशीत गुन्हा उघडकीस आला. 

अमेरिकेतील कंपनीकडून ५ दशलक्ष डॉलरचा विमा मिळविण्यासाठी मुख्य आरोपी प्रभाकर भीमाजी वाघचौरे याने त्याच्या चार साथीदारांसह वेडसर असलेल्या व्यक्तीचा सर्पदंश करून खून केला. त्यानंतर क्लेम केला होता. संशय आल्याने कंपनीने माहिती दिली. - मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसा