शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

चोर सोडून संन्याशाची हत्या! अंत्यविधीसाठी निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील महाराज हल्ल्यात ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 6:56 PM

चोरांच्या अफवेत कासा जवळील गडचिंचले येथील घटना

ठळक मुद्देगडचिंचले गावातील जमावाने चोर असल्याच्या संशयावरून हल्ला चढविला व यात या तिघा निष्पाप व्यक्तीचा नाहक बळी गेल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडलीठीकठिकाणी प्रवेश बंदी असल्याने हे वेगवेगळ्या मार्गाने कासा हद्दीत पोहोचले आणि गडचिंचले येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

हुसेन मेमन / शशिकांत ठाकूर

जव्हार/ कासा - कांदिवली येथून भाड्याच्या वाहनाने सुरत येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील श्री मौनीबाबा मठ तथा दक्षिणमुखी हनुमान मंदीर आश्रमाचे मुख्य महंत श्री कल्पवृक्ष गिरी तथा चिकना अघोरी महाराज हे (70) यांचा व त्यांचे कांदिवली येथील शिष्य सुशीलगिरी महाराज (30) व कारचालक निलेश तेलवडे (30) अशा तीन जणांना डहाणू तालुक्यातील कासा हद्दीतील सायवन-दाभाडी-खानवेल या रस्त्यात लगत असलेले गडचिंचले गावातील जमावाने चोर असल्याच्या संशयावरून हल्ला चढविला व यात या तिघा निष्पाप व्यक्तीचा नाहक बळी गेल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली, याचे पडसाद सर्वत्र पसरले आहेत.मुबंईहून भाड्याच्या कारने प्रवासी पास नसताना सुरतकडे रवानामुंबई येथुन ज्या कारमध्ये हे प्रवास करत होते. त्या कारच्या नोंदणी क्रमांकावरून कार मालकाचा पत्ता कासा पोलिसांनी मिळवला आणि तेथून कार मालकाने दिलेल्या माहितीनुसार हे तिघे कांदिवली येथून कल्पवृक्षगिरी महाराज यांच्या शिष्याचे निधन झाल्यामुळे ते अंतीमविधीसाठी सुरतला जाणार होते, मात्र त्यांना सुरत जाण्यासाठी लॉकडाऊन काळात प्रवासी पास मिळाला नाही. त्यामुळे हे पास न घेताच सुरतकडे रवाना झाले. मात्र, ठीकठिकाणी प्रवेश बंदी असल्याने हे वेगवेगळ्या मार्गाने कासा हद्दीत पोहोचले आणि गडचिंचले येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.जमावाने पोलिसांच्या गाडीतून जात असताना पुन्हा चढवला हल्ला आणि पोलीस वाहनाची केली तोडफोडकासा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी या तिघांना ताब्यात घेत पोलीस वाहनात बसवले मात्र, जमावाने कुठलेही भान न ठेवता पोलीस वाहनात बसलेल्या या तिघांना दगड, काठी, सळईने मारण्यास सुरवात केली यात पोलिसांनी आपला जीव वाचवत बाहेर पडले मात्र जमाव संख्या जास्त असल्यामुळे पोलिसही हतबल झाले आणि पोलिसांच्या समोरच या तिघांचा जमावाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.अटक करण्यात आलेल्या 110 आरोपींपैकी 9 आरोपी 18 वर्षांखलील असल्याने त्यांना बालसुधारगृह भिवंडी येथे पाठविण्यात आले असून इतर 101 आरोपींना डहाणू कोर्टात हजर करण्यात आले आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करीत आहे.महाराजांबाबत माहिती  

कल्पवृक्षगिरी तथा चिकना अघोरी हे येथील श्रीपंचायती दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे महंत होते. त्र्यंबकेश्वर व इतरही ठिकाणी भरणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात ते आपल्या अखाड्या तर्फे शाहीस्नान करीत असत. ते अखाड्यात राहात नसले तरी स्वतंत्र आश्रमात राहात असत. त्र्यंबकेश्वर सह मुंबई गुजरात उत्तर प्रदेश आदी ठिकाणी त्यांचे मठ आश्रम होते. भारतात त्यांचे अनेक भक्त होते. दरम्यान, त्यांचा शिष्य परिवार त्यांचे पार्थिव कासा येथून त्र्यंबकेश्वर आश्रमात आणून त्यांना समाधी देणार असल्याचे समजते.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखूनArrestअटक