शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बॉडी बिल्डींगसाठी हडकुळ्या चोरानं केली प्रोटिन्सची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:06 AM

सीसीटीव्हीच्या आधारे तपास होऊ नये यासाठी रेकॉर्डर घेऊन चोर पसार

नवी दिल्ली : एका 20 वर्षांच्या हडकुळ्या चोरानं बॉडी बिल्डींग करण्यासाठी प्रोटिन्स लंपास केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. फक्त 35 किलो वजन असलेल्या चोराला शरीरयष्टी मजबूत करण्याची इच्छा होती. प्रोटिन्स खाऊन शरीर मजबूत होतं, असा सल्ला कोणीतरी चोराला दिला. त्यामुळे चोर त्याच्या दोन मित्रांसह एका दुकानात गेला आणि त्यानं दुकानदाराच्या डोक्यावर बंदूक रोखून लाखो रुपयांचे प्रोटिन्स लंपास केले. प्रोटिन्सच्या चोरीप्रकरणी नॉर्थ रोहिणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरीची घटना रोहिणी सेक्टर 8 मधील प्रोटिनच्या दुकानात सोमवारी दुपारी घडली. त्यावेळी एक अतिशय हडकुळा व्यक्ती दुकानात आला. त्यानं दुकानदाराकडे प्रोटिन पावडर मागितली. दुकानात असलेल्या अंकुश यांनी त्या व्यक्तीला जिम ट्रेनरचा सल्ला घेण्यास सांगितलं. आरोपीनं वारंवार अंकुश यांच्याकडे प्रोटिन पावडर मागितली. मात्र अंकुश यांनी साफ नकार दिला. त्यामुळे आरोपी तिथून निघून गेला. काही वेळानंतर आरोपी पुन्हा दुकानात आला आणि त्यानं पुन्हा प्रोटिन पावडरची मागणी केली. यावेळी आरोपीनं अंकुश यांना प्रोटिन पावडरच्या ब्रँडचं नाव लिहून देण्यास सांगितलं. अंकुश ब्रँडचं नाव लिहित असताना आरोपीनं त्यांचा हात मुरगळला आणि त्याच्या डोक्यावर बंदूक रोखली. त्याचवेळी आरोपीचे दोन साथीदार दुकानात घुसले. त्यांनी लाखो रुपयांचे प्रोटिन्स घेऊन पळ काढला. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी चोरटे सीसीटीव्हीचा रेकॉर्डर घेऊन पसार झाले.  

टॅग्स :theftचोरीThiefचोर