Six-year-old girl sexually assaulted by an elderly man | सहा वर्षांच्या मुलीवर वृद्धाकडून लैंगिक अत्याचार
सहा वर्षांच्या मुलीवर वृद्धाकडून लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देव्ही. बी. नगर पोलिसांनी हमीदला अटक केली.हमीदचे किराणा मालाचे दुकान आहे.

मुंबई : चॉकलेटचे आमिष दाखवून ६ वर्षांच्या मुलीवर ६१ वर्षांच्या अब्दुल हमीदने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. व्ही. बी. नगर पोलिसांनी हमीदला अटक केली.

हमीदचे किराणा मालाचे दुकान आहे. १ डिसेंबरला दुपारी मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने दुकानात बोलावले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही सांगू नये, यासाठी तिला धमकी दिली. मंगळवारी त्याने मुलीवर पुन्हा अत्याचार केले. तिने याबाबत घरी सांगितल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली.

Web Title: Six-year-old girl sexually assaulted by an elderly man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.