Accident: सात फेरे घेऊन घरी परतत होते; उत्तर प्रदेशमध्ये टेम्पो-कार धडकेत नवरदेव, वधूसह सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 20:51 IST2021-07-24T20:50:04+5:302021-07-24T20:51:16+5:30
Road Accident in Rampur:वेगाने येणाऱ्या टेम्पोची इको कारला समोरासमोर जोरदार धडक बसली. कारमध्ये सहा जण होते.

Accident: सात फेरे घेऊन घरी परतत होते; उत्तर प्रदेशमध्ये टेम्पो-कार धडकेत नवरदेव, वधूसह सहा जणांचा मृत्यू
रामपुर: उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नवरदेव आणि नववधुसह 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिव्हिल लाईन्स पोलीस ठाणे हद्दीत हायवे बायपासवर हा अपघात झाला आहे. हे सर्वजण बिहारमध्ये लग्न करून घरी परतत होते. (bride, groom killed inroad accident, returning after marriage.)
शनिवारी वेगाने येणाऱ्या टेम्पोची इको कारला समोरासमोर जोरदार धडक बसली. कारमध्ये सहा जण होते. या अपघातात नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर नववधू गंभीर जखमी झाली होती. तिला पोलिसांनी अॅम्बुलन्समधून जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. उपचारावेळी नववधूनेही प्राण सोडला. तर घटनास्थळावरून टेम्पो चालक फरार झाला.
टेम्पोमधून आंब्यांची वाहतूक केली जात होती. अपघातानंतर टेम्पो चालकाने फळ काढला. मृतांमधील सर्व ग्रेटर नोएडाचे राहणारे होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी संसार सिंह यांनी सांगितले की, इको कारमधील लोक बिहारमध्ये लग्न करून परतत होते. यामध्ये नवविवाहित जोडपेदेखील होते. कारला मुरादाबादहून येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर नवरीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.