Six lakh worth of ganja seized; Bihari duo arrested | सहा लाखांचा गांजा जप्त; बिहारी दुकली जेरबंद 
सहा लाखांचा गांजा जप्त; बिहारी दुकली जेरबंद 

ठळक मुद्देअमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयाखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.कोकण रेल्वे स्थानकावर पोलीस गस्त घालत असताना एक इसम हातात बॅग घेउन संशयास्पदरित्या फिरताना आढळला. दीपक कुमार (२0) व राजकुमार (२३) अशी संशयितांची नावे असून, ते मूळ बिहार राज्यातील आहेत.

मडगाव - गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर दोन बिहारींना पोलिसांनीअटक करुन सहा लाख बारा हजार रुपये किंमतींचा गांजा जप्त केला. दीपक कुमार (२0) व राजकुमार (२३) अशी संशयितांची नावे असून, ते मूळ बिहार राज्यातील आहेत. कोकण रेल्वे पोलिसांनी आज दुपारी ही कारवाई करताना वरील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयाखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष नाईक व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गांजा जप्त केला. कोकण रेल्वे स्थानकावर पोलीस गस्त घालत असताना एक इसम हातात बॅग घेउन संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन त्याची झडती घेतली असता, बॅगेत सहा किलो एकशेअठ्ठावीस ग्राम गांजा सापडला. त्याची किंमत सहा लाख बारा हजार आठशे रुपये इतकी आहे. मागाहून दीपककडून गांजा घेण्यासाठी राजकुमार हा आला असता, पोलिसांनी त्यालाही अटक केली. पुढील पोलीस तपास चालू आहे. रेल्वेतून गोव्यात गांजाचा पुरवठा होत असतो. याच आठवडयात रेल्वे सुरक्षा पोलीस दलाने एक बेवारसी बॅग जप्त केली होती. त्यात सात किलो गांजा सापडला होता. मागाहून हे प्रकरण पुढील तपासासाठी कोकण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

 

 

Web Title: Six lakh worth of ganja seized; Bihari duo arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.