हनी ट्रॅप लावून सहा लाख उकळले; व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 02:19 PM2023-05-15T14:19:00+5:302023-05-15T14:19:43+5:30

चाैघांनाही १७ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

Six lakh rob with honey trap; The businessman was kept at the lodge | हनी ट्रॅप लावून सहा लाख उकळले; व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून 

हनी ट्रॅप लावून सहा लाख उकळले; व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून 

googlenewsNext


ठाणे : हनी ट्रॅप लावून ठाण्यातील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाकडून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघांना जेरबंद केल्याची माहिती श्रीनगर  पाेलिसांनी दिली. टोळीने भिवंडीतील एका लॉजवर चाकूच्या धाकावर डांबून ठेवले होते. चाैघांनाही १७ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

या व्यावसायिकाने खंडणी दिल्यानंतरही त्याच्या वागळे इस्टेट येथील दुकानात टाेळके पुन्हा पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याचआधारे वरिष्ठ निरीक्षक किरण काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक नितीन हांगे, हवालदार चंद्रकांत सकपाळ,  नाईक रूपाली वंजारी, नितीन शेळके व राकेश पवार आदींच्या पथकाने १३ मे राेजी महिलेसह चाैघांनाही अटक केली.  १ एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १२ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हा खंडणी, ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होता. यातील शीतल लांजेकर (२७, भांडूप नावात बदल) या महिलेने या व्यावसायिकाशी मैत्री केली.

त्यानंतर समीर मांजरेकर (रा. भांडूप), आदित्य गुप्ता ( ठाणे), राहुल यादव (रा. मुलुंड) व त्यांचा अन्य एक साथीदार यांच्याशी संगनमत करून शीतलबराेबर संबंध असल्याची भीती दाखवली. नंतर त्याचे अपहरण करून भिवंडीतील मानकोली येथील  लॉजवर नेऊन डांबून ठेवले. त्याची स्कूटरही त्याच्याकडून जबरद आले. सहा लाख ९० हजारांच्या खंडणीसह स्कूटर असा  सात लाख १५ हजारांचा मुद्देमाल बळकावला. हे टाेळके दुकानात खंडणीसाठी आले. त्याचवेळी सापळा लावून पाेलिसांनी त्यांना पकडले
 

 

Web Title: Six lakh rob with honey trap; The businessman was kept at the lodge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.