शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

स्टंटबाज सहा परदेशी नागरिकांची पोलिसांनी केली मायदेशी रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 8:13 PM

इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या सहा परदेशी नागरिकांचा माग काढत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

ठळक मुद्देजीवघेणा स्टंटबाजी करणाऱ्या सहा परदेशी नागरिकांची मुंबई पोलिसांनी मायदेशी रवानगी केली आहे. रहिवाशांनी देखील वेळ न घालवता या स्टंटबाजांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवलीपरदेशात हा प्रकार रुफ टॉप जंप म्हणून प्रसिद्ध आहे

मुंबई - प्रभादेवी रेल्वे स्थानकानजीक एका इमारतीच्या टेरेसवर जीवघेणा स्टंटबाजी करणाऱ्या सहा परदेशी नागरिकांची मुंबई पोलिसांनी मायदेशी रवानगी केली आहे. याप्रकरणी इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या सहा परदेशी नागरिकांचा माग काढत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. प्रभादेवी स्थानकानजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही १४ मजल्यांची एसआरए इमारत आहे. या इमारतीत आणि बाजूच्या इमारतीत एकूण २२ फुटांचे अंतर आहे. हे ६ जण कुणाच्याही नकळत एका इमारतीच्या टेरेसच्या कठड्यावरून दुसऱ्या इमारतीच्या टेरेसवर उडी मारत होते. एका अज्ञात व्यक्तीने ही स्टंटबाजी मोबाइलवरून शूट करून ती सोशल मीडियावर टाकताच हा काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ वायरल झाला. सोमवारी दुपारी या इमारतीचा सुरक्षा रक्षक इमारतीचा पाणीपुरवठा तपासण्यासाठी टेरेसवर गेला असता त्याने ही स्टंटबाजी बघितली. त्यानंतर त्याने तात्काळ यासंदर्भातील माहिती इमारतीच्या रहिवाशांना दिली. रहिवाशांनी देखील वेळ न घालवता या स्टंटबाजांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या व्हिडीओवरून ६ जणांचा माग काढल्यावर ते परदेशी नागरिक असल्याचे पुढे आले. पर्यटनासाठी मुंबईत आलेले हे सहाही जण ताज हॉटेलमध्ये थांबले होते. तिथून दादर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. परदेशात हा प्रकार रुफ टॉप जंप म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु भारतात मात्र असे स्टंट करणं कायद्याने गुन्हा आहे. टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सहा जणांवर कारवाई करून मायदेशी पाठविण्यात आले. 

Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट

टॅग्स :Stuntmanस्टंटमॅनCrime Newsगुन्हेगारी