हत्येनंतर 'दृश्यम' स्टाईलने गाढला मृतदेह; पतीसह ६ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 18:47 IST2019-03-20T18:47:41+5:302019-03-20T18:47:45+5:30
या प्रकरणी मुख्य सुत्रधार हा मृत महिलेचा पती असून त्याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.

हत्येनंतर 'दृश्यम' स्टाईलने गाढला मृतदेह; पतीसह ६ आरोपींना अटक
राजकोट - गुजरातमधील भुज परिसरात एक मन हादरून टाकणारी घटना घडली आहे. सिनेमाची कॉपी करत चक्क ६ आरोपींनी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह दृश्यम या हिंदी सिनेमाप्रमाणे अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीखाली गाढला आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधार हा मृत महिलेचा पती असून त्याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. मृत महिलेचं नाव रुकसाना आहे. तिच्या पतीचं नावं इस्माइल असून इतर अटक आरोपींची नावं जावेद मजोठी, साजिद खलीफा, सायमा, शब्बीर जुसाब आणि अल्ताफ मजोठी अशी आहेत. तसेच पोलिसांनी इमारतीखाली गाढलेला मृतदेहाचे अवशेष देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
इस्माइलने जानेवारी २०१८ मध्ये नाझिया नावाच्या महिलेशी दुसरं लग्न केलं. त्यामुळे रुकसाना आणि इस्माइलचं वाद होत असत. नेहमीच्या वादाला कंटाळून इस्माइलने रुकसानाचा काटा काढायचं ठरवलं आणि चुलत भाऊ जावेदला याबाबत सांगितलं. त्यानुसार जावेदने रुकसानाची आपल्या कारमध्ये हत्या केली. नंतर शब्बीर आणि अल्तापच्या मदतीने आयशा पार्कजवळील अंडर कंस्ट्रक्शन इमारतीच्याखाली गाढण्यात आलं होतं. या आरोपींनी रुकसानाच्या रक्ताने माखलेले कारचे सीट कव्हर देखील जाळून टाकले. सहा महिन्यांपूर्वी त्या इमारतीची जमीन सरकारने विकत घेतल्याचे समजताच आरोपींनी मृतदेह पुन्हा दुसऱ्या अंडर कंस्ट्रक्शन इमारतीच्याखाली गाढला. कोणाला संशय येऊ नये म्हणून इस्माइलने १० जून रोजी पोलीस ठाण्यात रुकसाना हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ४ महिन्यांनी गुजरात हायकोर्टमध्ये इस्माइलने आपल्या पत्नीच्या तक्रारीबाबत सखोल चौकशीसाठी अपील दाखल केलं. तसेच मृत महिलेच्या भावाने आणि आईने भुज कोर्टात इस्माइलवर संशय असल्याचं सांगितलं. त्यानंतर भांडाफोड होऊन पोलिसांनी पतीसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.