"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:55 IST2025-06-20T19:54:45+5:302025-06-20T19:55:39+5:30
दिरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या एका विवाहित महिलेला कुटुंबीयांनी फटकारले असता, तिने विषारी पदार्थ खाल्ला.

"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याच्या सैदपूर कोतवाली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दिरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या एका विवाहित महिलेला कुटुंबीयांनी फटकारले असता, तिने विषारी पदार्थ खाल्ला. तिच्या दिरानेही तोच मार्ग अवलंबला. यामुळे दोघांचीही प्रकृती गंभीर झाली, त्यांना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात आणि नंतर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. तिथून त्यांना वाराणसीला रेफर करण्यात आले, जिथे गुरुवारी रात्री वहिनीचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान दिरानेही शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.
सैदपूर भागातील एका गावातून समोर आलेला हा प्रकार धक्कादायक आहे. आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्या गेलेल्या दीर आणि वहिनीला कुटुंबीयांनी झापले असता, दोघांनीही घरात ठेवलेला विषारी पदार्थ खाल्ला. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथून त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. दोघांचीही प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना वाराणसीतील बीएचयूमध्ये दाखल करण्यात आले, जिथे वहिनीचा मृत्यू झाला.
दिरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती वहिनी
सैदपूर भागातील एका गावात बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता एका विवाहित महिलेच्या सासूने आपल्या सुनेला धाकट्या मुलासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. वहिनी आणि दिराला या अवस्थेत पाहून घरात खळबळ उडाली आणि सासूबाई खूप संतप्त झाल्या. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही त्यांच्या या कृत्याबद्दल खूप फटकारले. कुटुंबीयांनी फटकारल्यानंतर दीर आणि वहिनीने सल्फास खाल्ला. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली, तेव्हा रात्री साडेबारा वाजता दोघांनाही सैदपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती.
आत्महत्येचा प्रयत्न
डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार देत, त्यांना वाराणसीला पाठवले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात आणण्यास खूप उशीर झाला होता. त्यामुळे जीव वाचण्याची शक्यता खूपच कमी होती. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान वहिनीचा गुरुवारी रात्रीच मृत्यू झाला. तर, दिराने शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.