सोफ्यावर बसून गप्पा, अचानक उठले अन् ठांय-ठांय-ठांय; राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:36 IST2023-12-06T08:35:57+5:302023-12-06T08:36:12+5:30

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची त्यांच्याच घरी हत्या, प्रत्युत्तरात तीनपैकी एक मारेकरी ठार 

Shri Rashtriya Rajput Karni Sena president killed in his own house | सोफ्यावर बसून गप्पा, अचानक उठले अन् ठांय-ठांय-ठांय; राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष ठार

सोफ्यावर बसून गप्पा, अचानक उठले अन् ठांय-ठांय-ठांय; राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष ठार

जयपूर : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून त्यांच्याच निवासस्थानी हत्या करण्यात आली. तीन मारेकऱ्यांनी सुरुवातीला सोफ्यावर बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात अचानक त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. प्रत्युत्तरादाखल गोगामेडी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक मारेकरी मारला गेला. 

पलायनानंतरही गोळीबार
गोगामेडी यांच्यावर हल्ला केल्यानंतर पळून जाताना एका कारचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्कूटीचालकावर गोळी झाडत त्याला जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 

पद्मावत’ चित्रपटावेळी आले चर्चेत
श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कळवी यांच्यासोबतच्या मतभेदातून २०१५ मध्ये गोगामेडी यांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची स्थापना केली. ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात त्यांनी विरोध प्रदर्शन केले होते.

रोहित गोदाराने घेतली जबाबदारी
गोगामेडी यांच्या हत्येनंतर रोहित गोदारा गँगने फेसबुक पोस्ट करत घटनेची जबाबदारी स्वीकारली. ते आपल्या शत्रूंना मदत करत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचा बदला आता घेत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

Web Title: Shri Rashtriya Rajput Karni Sena president killed in his own house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.