अमानुषपणा! श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये होता अन् तिथेच 'दुसरी'सोबत आफताब प्रेमरंग उधळत होता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 10:01 IST2022-11-15T09:57:23+5:302022-11-15T10:01:15+5:30
श्रद्धा मर्डर केसने संपूर्ण देश हादरला आहे. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाने, या घटनेची संपूर्ण तयारी केली होती.

अमानुषपणा! श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये होता अन् तिथेच 'दुसरी'सोबत आफताब प्रेमरंग उधळत होता!
श्रद्धा मर्डर केसने संपूर्ण देश हादरला आहे. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाने, या घटनेची संपूर्ण तयारी केली होती. तो ज्या श्रद्धासोबत प्रेमाचे नाटक करत होता, तिचीच त्याने एवढ्या भीषण पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत.
श्रद्धाचा मृतदेह ज्या खोलीत त्याने ठेवला होता त्याच खोलीत आफताब दुसऱ्या मुलीसोबत राहत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीपोलिसांना चौकशी दरम्यान ही माहिती मिळाली आहे. श्रद्धाची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि काही आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात फेकून दिले.
मीट कापायच्या सुऱ्यानं केले श्रद्धाचे 35 तुकडे, आफताबने 'हा' शो पाहून बनवला थरकाप उडवणारा प्लॅन
श्रद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये असतानाही २८ वर्षीय आफताब पूनावाला दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता. आणि त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा आरोप आहे. बंबल या डेटिंग अॅपच्या माध्यमातून आफताब श्रद्धाच्या संपर्कात आला होता, त्याच अॅपद्वारे तो दुसऱ्या मुलीच्या संपर्कात आला होता आणि तिला डेट करत होता.
ही दुसरी मुलगी जून-जुलैमध्ये अनेकदा आफताबच्या भाड्याच्या घरात आली होती. आफताबने श्रद्धा वॉकरच्या शरीराचे अवयव फ्रीज आणि किचनमध्ये लपवून ठेवले होते. आफताबने आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची दिल्लीतील मेहरौली परिसरात गळा दाबून हत्या केली, तिच्या शरीराचे सुमारे 35 तुकडे केले आणि सुमारे तीन आठवडे 300 लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. ते तुकडे विविध भागात फेकले. आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही भीषण घटना समोर आली आहे.
आफताब हा प्रशिक्षित शेफ आहे. त्याने हा गुन्हा करुनही सहा महिने कोणाला याची खबर नव्हती. खून केल्यानंतर तो त्याच घरात राहत होता ज्या घरात दोघे एकत्र राहत होते. लग्नावरून झालेल्या भांडणानंतर त्याने श्रद्धा वॉकरची हत्या केल्याचे कबुल केले. त्याने ही हत्या 'डेक्स्टर' ही अमेरिकन वेबसिरीज पाहून केल्याची माहिती समोर आली आहे.