शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

Shraddha Murder Case: आफताबच्या कुकर्माच्या पुराव्यांसाठी पराकाष्ठा, सीसीटीव्ही, कपड्यांचाही शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 08:10 IST

Shraddha Walker Murder Case : वसईच्या श्रद्धा वालकर (२७) हिची दिल्ली येथे तिचा प्रियकर आफताब पूनावालाने (२८) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी त्याच्या कुकर्माचे पुरावे जमा करण्याची कसरत पोलिसांसमोर आहे.

नवी दिल्ली/नालासोपारा : वसईच्या श्रद्धा वालकर (२७) हिची दिल्ली येथे तिचा प्रियकर आफताब पूनावालाने (२८) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी त्याच्या कुकर्माचे पुरावे जमा करण्याची कसरत पोलिसांसमोर आहे. आता त्यासाठी सीसीटीव्ही शोधले जात आहेत आणि ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशीचे कपडेही पोलिसांना हवे आहेत. श्रद्धाची हत्या सहा महिन्यांपूर्वी झाली होती. तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना हवे आहेत; पण फुटेजचे बॅकअप केवळ १५ दिवसांचे असल्याचे कळते. त्यामुळे आधीचे व्हिडीओ फुटेज मिळवण्यासाठी टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. श्रद्धाच्या कपड्यांचाही शोध सुरू असून, आफताबच्या फ्लॅटमधून पोलिसांनी तिच्या कपड्यांची एक बॅग जप्त केली आहे. तिच्या कपड्यांची आणखी एक बॅग पोलिसांना तिच्या वडिलांकडून हवी असल्याचेही समजते. ज्या दिवशी हत्या केली, त्या दिवशी आफताबने सगळे कपडे एका कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचेही समजते. त्यामुळे हा गुंता आणखी वाढत जाणार आहे. आफताबच्या नार्को टेस्टची तयारीश्रद्धाच्या बेपत्ता होण्याबाबत, तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटबाबत, तिचा खून नेमका कसा केला आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच मैत्रिणीसोबत केलेली मजा याबाबत आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. आफताबला घटनास्थळी नेऊन गुन्हा कसा घडला याची रंगीत तालीमही पोलिसांनी केली.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस