धक्कादायक! छोट्या भावाचे आरोपीच्या पत्नीशी संबंध, मोठ्या भावाला कारसह जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:07 IST2023-04-03T16:06:49+5:302023-04-03T16:07:14+5:30

नागाराजूला जिवंत जाळणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. बदल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे.

Shocking! Younger brother's relationship with accused's wife, elder brother who's software engineer burnt alive with car near tirupati | धक्कादायक! छोट्या भावाचे आरोपीच्या पत्नीशी संबंध, मोठ्या भावाला कारसह जिवंत जाळले

धक्कादायक! छोट्या भावाचे आरोपीच्या पत्नीशी संबंध, मोठ्या भावाला कारसह जिवंत जाळले

आंध्रप्रदेशच्या तिरूपतीहून धक्कादायक बातमी येत आहे. एका ३५ वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची कार थांबवून त्याला कारमध्येच जिवंत जाळण्यात आले आहे. छोट्या भावाचे आरोपीच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चित्तुरचा राहणारा सोमपल्ली नागाराजू हा त्याच्या गावाहून तिरूपतीला जात होता. तेव्हा त्याची कार चार जणांनी रोखली आणि आग लावली. काही क्षणांतच कार जळाली, यामुळे आतमध्ये अडकलेल्या नागाराजूचा देखील जळून मृत्यू झाला. 

नागाराजूला जिवंत जाळणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. बदल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. नागाराजूच्या छोट्या भावाचे आरोपीच्या पत्नीसोबत लफडे होते. प्रकरण बाहेर येताच नागाराजूने त्याचा भाऊ आणि आरोपीमध्ये येत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. या रागातून आरोपीने नागाराजूलाच मारले आहे. 

नागाराजूच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीला छोट्या मुलाला संपवायचे होते, परंतू त्यांनी मोठ्या मुलालाच मारले, असा आरोप त्यांनी केला आहे. नागाराजूला मारणारे तिघेजण फरार झाले आहेत. नागाराजूच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची दोन मुले आणि पत्नी हमसून हमसून रडत आहेत. 
 

Web Title: Shocking! Younger brother's relationship with accused's wife, elder brother who's software engineer burnt alive with car near tirupati