Shocking! Young man arrested for threatening by posting obscene photos of students on Instagram | धक्कादायक! इन्स्टाग्रामवर विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकाविणाऱ्या तरुणाला अटक 

धक्कादायक! इन्स्टाग्रामवर विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकाविणाऱ्या तरुणाला अटक 

ठळक मुद्देफोटो अपलोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर कॉलेजमधील विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकावण्याचे काम अक्षत करायचा. अक्षतच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबई - इन्स्टाग्रामवर विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकाविणाऱ्या १९ वर्षीय तरुणास लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अक्षत दोशी असं या तरुणाचं नाव आहे. फोटो अपलोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर कॉलेजमधील विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकावण्याचे काम अक्षत करायचा. दोन मुलींना धमकावल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दक्षिण मुंबईतील एका नामांकित कॉलेजात शिक्षणारा आरोपी अक्षत हा टी.वाय.बी. कॉमचे शिक्षण घेत आहे. अक्षत हा इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीचे वारंवार फोटो पहायाचा. एकदा त्याने पीडित तरुणीला इन्स्टाग्रामच्या बनावट खात्यावरून मेसेज करत, पीडितेचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ क्लिप तिला पाठवली. त्यानंतर त्याने पीडितेला मी जे सांगेल तसे करायचे असं सांगून धमकावले. बदनामीच्या भितीने पीडित तरुणीने अक्षत जे सांगेल तसे करत होती. अक्षतने तरुणीच्या नावाने बनावट खाते उघडून त्याद्वारे तो इन्स्टाग्रावरील तरुणांशी अश्लील संभाषण करायचा. अक्षतच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हा वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या तपासासाठी वर्ग केला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्या तपास करून अक्षतला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल  पोलिसांनी तपासला असता त्याने अशा प्रकारे इतर दोन महिलांना ही जाळ्यात ओढले होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shocking! Young man arrested for threatening by posting obscene photos of students on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.