धक्कादायक..! वॉशरुमला जाण्यास मनाई करून विवाहितेला घरात ठेवले डांबून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:35 IST2019-03-22T16:34:50+5:302019-03-22T16:35:41+5:30

मला तू घटस्फोट दे, नाही तर तुला चाकून मारुन टाकीन...

Shocking ..! women closed in the house with Do not go to the washroom | धक्कादायक..! वॉशरुमला जाण्यास मनाई करून विवाहितेला घरात ठेवले डांबून 

धक्कादायक..! वॉशरुमला जाण्यास मनाई करून विवाहितेला घरात ठेवले डांबून 

पिंपरी : घटस्फोटासाठी चाकूने मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच  घरात बंद करून ठेवत महिलेस वॉशरुमला जाण्यासही सासू सासऱ्यांनी मनाई केल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने विवाहितेच्या पती, सासू आणि सासºयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील विवाहित महिलेच्या पतीने ९ मार्च २०१९ रोजी धमकी दिली. मला तू घटस्फोट दे, नाही तर तुला चाकून मारुन टाकीन. तू जर न्यायालयाकडून नोटीस पाठवली तर ती घेणार नाही आणि नोटीस घेतली तर वकीलाला पैसे चारून दहा-दहा वर्षे केस चालवून तुझे आयुष्य बरबाद करेन, अशी धमकी पतीने महिलेस दिली. तसेच तू अमिर बंधा ढुंड, और उसमेसे जो पैसे मिलेंगे उसमेसे आधे मेरे को देना असे पतीने संबंधित महिलेस सांगितले. त्यानंतर महिलेवर अत्याचार केला. 
फिर्यादी महिलेचे सासू आणि सासरे यांनीही १८ मे २०१८ पासून वेळोवेळी महिलेचा छळ केला. घरातील कोणत्याही वस्तूस हात लावू न देता पिण्याच्या पाण्यास व वाशरुमला जाण्यास मनाई केली व घरामध्ये बंद करून ठेवले. तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये रितीरिवाजानुसार काही दिले नाही म्हणून हाताने मारहाण केली. भाड्याने घेतलेल्या खोलीच्या अनामत रक्कमेसाठी पतीने महिलेच्या आईकडून २० हजार रुपये घेतले होते. ते परत न करता तुज्या आईवडिलांकडून आणखी दहा लाख रुपये व्यवसायासाठी घेऊन ये, असे वारंवार सांगत होते. ते आणले नाहीत म्हणून पती, सासू आणि सासऱ्यांनी विवाहित महिलेला त्रास दिला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. 

Web Title: Shocking ..! women closed in the house with Do not go to the washroom