धक्कादायक! नोकरी सुटल्याने नैराश्येतून महिलेने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:00 IST2020-01-03T15:53:31+5:302020-01-03T16:00:54+5:30

गुरुवारी दुपारी हा प्रकार चारकोपमध्ये घडला.

Shocking! Woman suicide due to depression in charkop | धक्कादायक! नोकरी सुटल्याने नैराश्येतून महिलेने केली आत्महत्या

धक्कादायक! नोकरी सुटल्याने नैराश्येतून महिलेने केली आत्महत्या

ठळक मुद्देडिंपल वाडीलाल (४०) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना चारकोपमध्ये घडली. स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल करीत याबाबत पोलिसांना कळविले.

मुंबई - नोकरी गमावल्याच्या नैराश्यातून राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत डिंपल वाडीलाल (४०) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना चारकोपमध्ये घडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार चारकोपमध्ये घडला.

हिंदुस्थान नाक्याजवळ रॉक एन्क्लेव्ह ही इमारत आहे. या इमारतीत वाडीलाल आई आणि भावासोबत राहायची. तिचा भाऊ परदेशी गेल्याने सध्या आईच घरी होती. वाडीलाल खासगी कंपनीत नोकरी करायची. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर लग्न करण्याचे तिने ठरविले होते. मात्र नोकरी गमावल्याने ती फारच निराश झाली होती. नोकरी गेल्याने आता आपले लग्न होणार नाही, असे तिला वाटू लागले. त्या तणावात तिने गुरुवारी दुपारी राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. त्या वेळी तिची आई घरी एकटीच होती. स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल करीत याबाबत पोलिसांना कळविले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अद्याप तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडलेली नाही.

 

Web Title: Shocking! Woman suicide due to depression in charkop