धक्कादायक! कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 19:17 IST2020-03-09T19:15:48+5:302020-03-09T19:17:46+5:30

३३ वर्षीय आरोपीने लिफ्ट दिली आणि तिच्यासोबत दुष्कर्म केले.  

Shocking! A woman raped by a pretending to lift a car pda | धक्कादायक! कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार

धक्कादायक! कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार

ठळक मुद्देहैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.६) घडली. महिलेने शनिवारी तक्रार दाखल केल्यांनतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

हैदराबाद - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका २३ वर्षीय विवाहित महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आला. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. हैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.६) घडली. पीडित विवाहित महिला चंदनवेली गावात जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असताना तिला ३३ वर्षीय आरोपीने लिफ्ट दिली आणि तिच्यासोबत दुष्कर्म केले.  


पीडित महिलेला तिच्या गावी जायचे होते. त्यावेळी आरोपीने तिला गाडीमध्ये लिफ्ट दिली. मात्र, पीडित महिलेला इच्छित स्थळी सोडण्याऐवजी, आरोपी निर्जनस्थळी गाडी घेऊन गेला आणि कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली. महिला ज्या गावात राहते, त्याच गावात आरोपी सुद्धा राहतो. महिलेने शनिवारी तक्रार दाखल केल्यांनतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Shocking! A woman raped by a pretending to lift a car pda