धक्कादायक! पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केमिकलद्वारे जीवे मारण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:10 IST2019-01-14T21:06:45+5:302019-01-14T21:10:16+5:30
केमिकलद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीनेच पोलीस ठाणे गाठून पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

धक्कादायक! पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केमिकलद्वारे जीवे मारण्याचा केला प्रयत्न
अहमदनगर - पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा वापर करून पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. केमिकलद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीनेच पोलीस ठाणे गाठून पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारदार पती लष्करात असून काही दिवसांच्या सुट्टीवर ते घरी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. नगर तालुका पोलिसांनी फिर्यादीची पत्नी व तिचा साथीदार सतीश संपत डमरे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
शरीरसंबंधांपूर्वी फिर्यादी पतीने पत्नीने दिलेली क्रिम गुप्तांगाला लावली. या केमिलकच्या क्रिममुळे पतीच्या गुप्तांगाला काही दिवसांनी इजा झाली. फिर्यादी पतीने या प्रकरावरून आपल्याला मारण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार नगर तालुका पोलिसांकडे दाखल केली. नगर तालुका पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून पत्नी आणि डमरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.