Shocking! Wife has gang-raped by husband with friends in kerala, thiruvananthapuram | धक्कादायक! पत्नीस जबरदस्तीने दारु पाजून मित्रांसह केला सामूहिक बलात्कार

धक्कादायक! पत्नीस जबरदस्तीने दारु पाजून मित्रांसह केला सामूहिक बलात्कार

ठळक मुद्दे पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, नवरा आणि त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि निर्जन ठिकाणी नेले. जिथे ती रस्त्यावरून जाणाऱ्या कारला जोरात धडक देता देता वाचली. पतीसह सर्व आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 323, 324, 354, 354 डी, 376 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केरळमधूनसामूहिक बलात्काराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मित्रांसह सामूहिक बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्य करणार्‍या महिलेचा हा दुसरा तिसरा व्यक्ती नसून महिलेचा नवरा आहे. ही घटना तिरुअनंतपुरमच्या हद्दीत कादिनामकुलमजवळ घडली आहे. गुरुवारी रात्री महिलेवर निर्जन ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला.

 

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, नवरा आणि त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही तक्रार मिळताच पीडितेच्या पतीसह पाच जणांना गुरुवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.


पीडितेचे म्हणणे आहे की, ती कशीबशी नराधमांच्या बंदिवासापासून सुटली आणि मुख्य रस्त्यावर पोहोचली. जिथे ती रस्त्यावरून जाणाऱ्या कारला जोरात धडक देता देता वाचली. पतीसह सर्व आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 323, 324, 354, 354 डी, 376 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकताच राजस्थानमधील बाडमेर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेथे एकाच कुटुंबातील दोन मुलींवर जवळपास दोन वर्षांपासून शेजारी रहाणारा नराधम बलात्कार करत होता. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शेजारी असल्याचा फायदा घेत मुलींना फसवून घरात नेण्यात आले. जिथे त्यांचे अश्लील फोटो काढले गेले होते, त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्याच्यावर बलात्कार केला जात होता.

अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... पोलिसांनी सांगितले की, पीडित दोघीही बहिणी असून त्यातील एक 17 आणि दुसरी 15 वर्षांची आहे. आरोपी तनवीर माली आणि नरेश दिशांतारी हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शाळेत जात असताना दोन्ही बहिणींना त्रास देत होते. यामुळे दोन्ही मुलींनीही शाळेत जाणे बंद केले.

 

सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात

 

पोलिसात तक्रार दिल्याचा राग, पिंप्राळा हुडकोत नगरसेवकावर प्राणघातक हल्लाcrim

Read in English

Web Title: Shocking! Wife has gang-raped by husband with friends in kerala, thiruvananthapuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.