अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 01:14 PM2020-06-05T13:14:54+5:302020-06-05T13:22:04+5:30

मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

The boy who is an engineer hit his mother on the head with a bat and ... | अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... 

अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... 

Next
ठळक मुद्देपोलिसांनी आता पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता(एईई) असलेल्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

नगरोटा भागात आईला मुलाला जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान जीएमसी (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) येथे तिची मृत्यू झाला. पोलिसांनी आता पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता(एईई) असलेल्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूर येथील रहिवासी असलेल्या कांती देवीला1 जून रोजी मुलगा अजय गुप्ता या मुलाने बॅटने मारहाण केली. त्याने बॅटने आईच्या डोक्यावर दोनदा प्रहार केला. यात कांती देवी गंभीर जखमी झाल्या. कांती देवीवर जीएमसीमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान कांती देवी यांचे निधन झाले. डीएसपी मोहन लाल यांचे म्हणणे आहे की, मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आरोपी अजय गुप्ता याला पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले आहे. मूळचा उधमपूर येथील रहिवासी अजय गुप्ता सध्या नगरोटा येथे राहत होता. त्याच्याकडे पाटबंधारे विभागात एईईचे पद आहे, पोस्टिंग उधमपुरात करण्यात आली होती.

 

लोकांनी विचित्र अवस्थेत प्रियकर अन् प्रेयसीला पकडलं अन्...

 

Video : हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस; रक्त देऊन 'त्या' योद्ध्याने वाचवला चिमुकलीचा जीव

 

दिल्ली हिंसाचाराचे मरकज कनेक्शन, या कॉल डिटेल्समधून खळबळजनक खुलासा

Web Title: The boy who is an engineer hit his mother on the head with a bat and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.