खळबळजनक! हॉटेलच्या टॉयलेटमध्ये महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण, वेटरविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 15:27 IST2021-01-06T15:27:26+5:302021-01-06T15:27:50+5:30
१८ वर्षांची तरुणी स्वच्छतागृहात गेली असताना तेथील वेटर तिचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याची घटना घडली.

खळबळजनक! हॉटेलच्या टॉयलेटमध्ये महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण, वेटरविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : हॉटेलमधील स्वच्छतागृहात महिलांचे एकांत स्थितीत व्हिडिओ चित्रण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी हॉटेलच्या वेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हाफिज अन्सारी (वय १८, रा. हॉटेल हॅपी द पंजाब, सुतारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या वेटरचे नाव आहे. ही घटना सुतारवाडी येथील हाॅटेल हॅपी द पंजाब येथे सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी त्यांचे कुटुंबासह जेवण करण्यासाठी रात्री हॉटेल हॅपी द पंजाबमध्ये गेल्या होत्या. त्या महिलांच्या स्वच्छतागृहात गेल्या असताना तेथील वेटर त्यांचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत होता. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या वेटरकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना धक्का देऊन तो पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक भागवत अधिक तपास करीत आहेत.