धक्कादायक ! अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 04:08 PM2020-02-03T16:08:56+5:302020-02-03T16:10:17+5:30

पालकांनी शिक्षक स्वप्नील शृंगारे याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Shocking! Unnatural act of a teacher with an indecent student showing pornographic videos | धक्कादायक ! अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य

धक्कादायक ! अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य

Next
ठळक मुद्देशाळेच्या वरच्या मजल्यावर विद्यार्थिनींना नेऊन कृत्य

नांदेड- माळ टेकडी परिसरात म्हालज येथे चवथी पर्यंत असलेल्या प्रबोधन प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीना अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली. घटनेनंतर पालकांनी शिक्षक स्वप्नील शृंगारे याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

म्हालज येथील प्रबोधन शाळेत इयत्ता चवथी पर्यंत वर्ग भरतात. येथील शिक्षक स्वप्नील शृंगारे हा गेल्या सहा महिन्यांपासून चिमुकल्या विद्यार्थिनींना मोबाईलमध्ये अश्लील विडिओ दाखवून अनैसर्गिक कृत्य करीत होता. याबाबत कुठे वाच्यता केल्यास शाळेच्या इमारती वरून फेकून देण्याची धमकी देण्यात येत होती. शाळेच्या वरच्या मजल्यावर विद्यार्थिनींना नेऊन तो हे कृत्य करीत होता. 

शिक्षकाच्या या कृत्यामुळे घाबरलेल्या अनेक मुली शाळेत जाण्यास नकार देत होत्या. त्यात शनिवारी एका चिमुकलीला शाळेतून आल्यानंतर घरी उलट्या करीत होती. त्यानंतर पालकांनी चौकशी केली असता चिमुकलीने शाळेतील प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त पालकांनी सोमवारी सकाळी शाळा गाठून मुख्याध्यापक याना जाब विचारला. त्यानंतर शिक्षक शृंगारे याला बोलावून घेण्यात आले, पालकांच्या प्रश्नावर शृंगारे उद्धटपणे उत्तरे देत होता. त्यामुळे पालकांनी चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आरोपी स्वप्नील शृंगारे याच्या विरोधात बाल लैगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, पोनी ननावरे यांनी भेट दिली.

Web Title: Shocking! Unnatural act of a teacher with an indecent student showing pornographic videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.