कोविड रूग्णालयातील धक्कादायक प्रकार; मृत महिलेच्या अंगावरील दागिने नेले चोरून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 20:56 IST2021-05-22T20:55:14+5:302021-05-22T20:56:01+5:30

Shocking type of covid hospital : सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल

Shocking type of covid hospital; Stealing jewelry from a dead woman's body | कोविड रूग्णालयातील धक्कादायक प्रकार; मृत महिलेच्या अंगावरील दागिने नेले चोरून

कोविड रूग्णालयातील धक्कादायक प्रकार; मृत महिलेच्या अंगावरील दागिने नेले चोरून

ठळक मुद्दे कारंजा (घा.) येथील रहिवासी ६७ वर्षीय महिलेला कोरोनाने आपल्या कवेत घेतले होते.

वर्धा : सावंगी येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेच्या मृत्यू पश्चात अज्ञाताने महिलेच्या अंगावरील दागिन चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने रूग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


कारंजा (घा.) येथील रहिवासी ६७ वर्षीय महिलेला कोरोनाने आपल्या कवेत घेतले होते. तिची प्रकृती बिघडल्याने तीला सावंगी (मेघे) येथील कोविड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु असताना ५ मे रोजी महिलेचा मृत्यू झााला. दरम्यानच्या कालावधीत अज्ञाताने मृत बाधित महिलेच्या अंगावरील १० ग्राम वजनाचे सोन्याचे मणी, ६ ग्राम वजनाचे सोन्याचे लॉकेट, काळ्या मण्यांत असलेली पोत असा एकूण ६० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.याप्रकरणी सावंगी पोलिसात बाधित महिलेच्या मुलाने तक्रर दाखल केली असून पुढील तपास सावंगी पोलीस ठाण्याचे ठाणेदार थोरात यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Web Title: Shocking type of covid hospital; Stealing jewelry from a dead woman's body