धक्कादायक! ‘टिक-टॉक’ कलाकार निघाला चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:36 IST2019-06-06T15:34:25+5:302019-06-06T15:36:29+5:30

गुप्ता हा कुर्ल्यातील बैलबाजार परिसरात राहतो.

Shocking The Tick-Talk artist thief got the thief | धक्कादायक! ‘टिक-टॉक’ कलाकार निघाला चोर

धक्कादायक! ‘टिक-टॉक’ कलाकार निघाला चोर

ठळक मुद्दे अभिमन्यू गुप्ता (२६) असे आरोपीचे नावतो ‘टिक-टॉक’ अ‍ॅपवर सतत अ‍ॅक्टिव्ह होताजुहू तारा रोड परिसरात त्याने घरफोडी केली होती.

मुंबई - घरफोडीप्रकरणी एकाला जुहू पोलिसांनीअटक केली आहे. अभिमन्यू गुप्ता (२६) असे आरोपीचे नाव असून, तो ‘टिक-टॉक’ अ‍ॅपवर सतत अ‍ॅक्टिव्ह होता, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुप्ता हा कुर्ल्यातील बैलबाजार परिसरात राहतो. जुहू तारा रोड परिसरात त्याने घरफोडी केली होती. या ठिकाणी एक वृद्ध जोडपे राहत असून ते गावी गेले होते.
त्या वेळी गुप्ताने त्यांच्या घराचा दरवाजा फोडत काही लाखांची चोरी केली होती. त्यानुसार, खबऱ्यांच्या मदतीने जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिरादार यांनी गुप्ताच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Shocking The Tick-Talk artist thief got the thief