शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

धक्कादायक! आंतरजातीय विवाह योजनेचा फायदा घेण्यासाठी तरुणीसोबत जबरदस्तीने लग्न केलं, नंतर बलात्कार करून घराबाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 17:49 IST

Crime News: एका तरुणाने अनुसूचित जातीच्या २० वर्षीय तरुणीसोबत केवळ आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लग्न केले. त्यानंतर त्याने या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करून तिला घराबाहेर काढले.

जयपूर - आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देते. समाजिक समरसता निर्माण व्हावी, अस्पृश्यता निवारण व्हावे, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र सरकारच्या या योजनेचा गैरफायदा घेण्यासाठी काही बदमाश मुलींच्या जीवनाशी खेल करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील चुरूजवळच्या बिसाऊ ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. (To take advantage of the inter cast marriage scheme, he forcibly married a young woman, then raped her and kicked her out of the house)

येथे एका तरुणाने अनुसूचित जातीच्या २० वर्षीय तरुणीसोबत केवळ आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लग्न केले. त्यानंतर त्याने या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करून तिला घराबाहेर काढले. या तरुणाने केलेल्या छळामुळे दु:खी झालेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले.

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडितेची निकेश जाट नावाच्या तरुणाशी ओळख होती. दरम्यान, निकेशने तिला फूस लावून दिल्लीला नेले. तिथे अनुसूचित जातीच्या मुलीशी विवाह केल्याबद्दलचे पाच लाख रुपये सरकारकडून मिळावेत म्हणून त्याने तिला धमकावून तिच्याशी लग्न केले. सदर तरुणाने पीडितेला ७ दिवस बंदी बनवून ठेवले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार पोलिसांचे भय आणि पाच लाख रुपयांच्या आमिषामुळे निकेशने सदर तरुणीला आधी घरी आणले. त्यानंतर मारहाण करून तिला घराबाहेर काढले.

नातेवाईकांनी सांगितले की, आरोपी तरुण निकेश याने तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास तिला विकून टाकण्याची धमकी दिली. तर पीडितेने सांगितले की, आता आरोपीकडचे लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे धक्का बसलेल्या पीडितेने सोमवारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने सुरुवातीला तणावाखाली येत झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. प्रकृती बिघडल्याने पीडितेला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी बिसाऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलीस आरोपींविरोधात कुठलीही कारवाई करत नसल्याचा, आरोप पीडितेने केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान