धक्कादायक! इमारतीवरून उडी मारून युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 19:29 IST2020-02-03T19:26:40+5:302020-02-03T19:29:42+5:30
अंबरनाथ - इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून युवकाने आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ येथील मोरोली पाडा परिसरात घडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. ...

धक्कादायक! इमारतीवरून उडी मारून युवकाची आत्महत्या
अंबरनाथ - इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून युवकाने आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ येथील मोरोली पाडा परिसरात घडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. आदित्य यादव (२५) असं या युवकाचं नाव आहे.
अंबरनाथ - इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून युवकाने आत्महत्या केल्याची घटना https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) February 3, 2020
आदित्य यादव हा रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरु होते अशी माहिती पोलिसांनी दिली. बाहेर फिरायला जातो असे सांगून गेलेल्या आदित्य यादव याने आज सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले. आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, याबाबत पोलीस तपास करत आहेत.