धक्क्कादायक! प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीची विनयभंगाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 20:14 IST2019-02-25T20:10:43+5:302019-02-25T20:14:09+5:30
दिलीप हरीजन असं या प्राध्यापकाचं नाव असून तो भवन्स काॅलेजमध्ये केमिस्ट्री विषय शिकवतो.

धक्क्कादायक! प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीची विनयभंगाची तक्रार
ठळक मुद्देगिरगावमध्ये राहणारी तक्रारदार तरूणी भवन्स काॅलेजमध्ये शिकत आहेसर्व विषयात पास करतो असे सांगून हा प्राध्यापक तरुणीकडे शारिरीक सुखाची मागणी करायचा.
मुंबई - शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीने गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलीप हरीजन असं या प्राध्यापकाचं नाव असून तो भवन्स काॅलेजमध्ये केमिस्ट्री विषय शिकवतो.
गिरगावमध्ये राहणारी तक्रारदार तरूणी भवन्स काॅलेजमध्ये शिकत आहे. सर्व विषयात पास करतो असे सांगून हा प्राध्यापक तरुणीकडे शारिरीक सुखाची मागणी करायचा. फोन करून तिला त्रासही द्यायचा. त्यामुळे अनेक दिवसांपासून तरुणी मानसिक तणावाखाली होती. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने गावदेवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.