धक्कादायक ! दारुला पैसे न दिल्यामुळे मुलाने वडिलांच्या डोक्यात घागर मारून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 23:59 IST2020-11-02T23:59:02+5:302020-11-02T23:59:37+5:30

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून राग आल्याने आरोपीने तांब्याची घागर वडिलांच्या डोक्यात घातली.

Shocking! The son stabbed his father in the head for not paying for alcohol | धक्कादायक ! दारुला पैसे न दिल्यामुळे मुलाने वडिलांच्या डोक्यात घागर मारून केला खून

धक्कादायक ! दारुला पैसे न दिल्यामुळे मुलाने वडिलांच्या डोक्यात घागर मारून केला खून

पिंपरी : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने वडिलांच्या डोक्यात तांब्याची घागर घालून खून केला. वेताळनगर, चिंचवड येथे रविवारी ही घटना घडली.
तानाजी सतबा सोलंकर (वय ५२, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, संजय तानाजी सोलंकर (वय 30) असे संशयित आरोपीचे नाव आहे. चंद्रभागा सतबा सोलंकर (वय ७०) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मयत तानाजी हा फिर्यादी चंद्रभागा यांचा मुलगा आहे. तर आरोपी संजय हा मयत तानाजी यांचा मुलगा आहे. आरोपी संजय हा रविवारी दारु पिऊन घरी आला. त्यावेळी त्याने वडील तानाजी आणि आजी चंद्रभागा यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत. त्याचा राग आल्याने आरोपी संजय याने तांब्याची घागर वडील तानाजी यांच्या डोक्यात घातली. यात त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Shocking! The son stabbed his father in the head for not paying for alcohol