धक्कादायक! दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 18:28 IST2019-07-16T18:25:28+5:302019-07-16T18:28:07+5:30

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Shocking Sexual harrasement of two kids; pocso case registered | धक्कादायक! दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण 

धक्कादायक! दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण 

ठळक मुद्देआरोपी समाउल्ला मुहम्मद इद्रिसी (३९) याच्या घरी गेल्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.वसई फाटा परिसरात राहणारी ३ वर्षाची पीडित मुलगी दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती.

वसई - विरारमधील सुरक्षारक्षकाने ६ वर्षीय मुलीसोबत गैरप्रकार केलेली घटना ताजी असतानाच वसई तालुक्यातील दोन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील परिसरात दोन चिमुकल्या मुलींसोबत शनिवारी दुपारच्या सुमारास अश्लील चाळे आणि लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

नालासोपारा पूर्वेकडील चाळीत राहणारी ४ वर्षीय पीडित मुलगी बाजूलाच राहणाऱ्या आरोपी समाउल्ला मुहम्मद इद्रिसी (३९) याच्या घरी गेल्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यावर तुळींज पोलिसांनी बलात्कार आणि पोस्कोअंर्तगत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेत वसई फाटा परिसरात राहणारी ३ वर्षाची पीडित मुलगी दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. मात्र, ती घरी परतली नाही म्हणून आई वडिलांनी शोधाशोध केली. आरोपी दीपक उर्फ आशिष तिवारी याने मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीवर नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना केली आहे. पीडित मुलीच्या आईने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.   

Web Title: Shocking Sexual harrasement of two kids; pocso case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.