धक्कादायक! १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 13:42 IST2019-01-24T13:40:44+5:302019-01-24T13:42:17+5:30
याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्कादायक! १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड
ठळक मुद्देपोलिसांनी आरोपी दिलीप माने (५२) याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दिलीप माने हा पीड़ित मुलीच्या वडिलांची देखभाल करायचा.
डोंबिवली - डोंबिवली पश्चिम येथील जुनी डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिलीप माने (५२) याला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी दिलीप माने हा पीड़ित मुलीच्या वडिलांची देखभाल करायचा. अपघातात पीडित मुलीच्या वडिलांना अपंगत्व आले होते. त्यामुळे त्यांच्या देखभालीचे कामकाज माने हा करत असे.