धक्कादायक! हिंदू धर्म शाळेत आढळला सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 19:00 IST2020-03-10T18:57:48+5:302020-03-10T19:00:18+5:30
रेल्वे स्टेशन समोरील घटना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता

धक्कादायक! हिंदू धर्म शाळेत आढळला सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृतदेह
अकोला - अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन चौकातील हिंदू धर्मशाळेत मंगळवारी दुपारच्या सुमारास एका सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मुतदेह आढल्याल्याने एकच खळबळ उडाली.
६३ वर्षीय मंतप्पा बसप्पा चेनिगोण्ड असे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव असून ते पुणे येथील रहिवासी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैयक्तिक कामाकरीता गत आठ दिवसापासून मंतप्पा बसप्पा चेनिगोण्ड हे या धर्मशाळेत वास्तव्यात होते. मंगळवारी रंगपंचमीमुले सुटीचा दिवस असल्याने धर्मशाळेतील कर्मचाऱ्याने साफ सफाई करीत थोडा उशीर लावला. त्यानंतर येथील कर्मचाऱ्याने साफसफाई साठी दरवाजा वाजवला असता मंतप्पा यांच्या खोलीतून कुठलाच प्रतिसाद न आल्याने कर्मचाऱ्याने ही बाब धर्मशाळेतील व्यवस्थापकला सांगितली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच रामदास पेठ पोलिसांना फोन वरून सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांन माहिती मिळताच रामदास पेठचे पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ६३ वर्षीय मंतप्पा बसप्पा चेनिगोण्ड हे मृत अवस्थेत आढळून आले. मृतदेहाचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.