धक्कादायक! होळीसाठी पैसे नाकारल्यानं कानाचा टवकाच काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 09:21 PM2020-03-11T21:21:57+5:302020-03-11T21:22:59+5:30

अरविंदच्या कानाचा तुकडा पडला असून त्याच्या वैद्यकीय उपचार करून गुन्हा दाखल करण्यात आला. 

Shocking! Refusing to pay money for Holi, taken bite to the ear pda | धक्कादायक! होळीसाठी पैसे नाकारल्यानं कानाचा टवकाच काढला

धक्कादायक! होळीसाठी पैसे नाकारल्यानं कानाचा टवकाच काढला

Next
ठळक मुद्देभा. दं. वि. कलम 325,34 प्रमाणे दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.फिर्यादी गिरी यांनी पैसे देण्यास विरोध केला असता त्या कारणावरून दारूचे नशेत आरोपी फोपाल याने फिर्यादी यांचे कानास चावा घेवून तुकडा पाडून जखमी केले

ठाणे - ठाण्यात पोखरण रोड नंबर २ येथे होळीच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. पालिकेच्या पाणी खात्यातील कामगारांनी बस धुण्यासाठी पाणी घेणाऱ्या अरविंद गिरी या इसमाने होळी साजरी करण्यासाठी पैसे न दिल्याने अरविंदच्या कानाला चावा घेतला. यामुळे अरविंदच्या कानाचा तुकडा पडला असून त्याच्या वैद्यकीय उपचार करून गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठाण्यात मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास सिद्धाचल इमारतीसमोर, हनुमान मंदिरजवळ, पोखरण रोड नंबर 2 येथे महानगर पालिका पाणी खाते विभागात कंत्राटी कामगार म्हणून सोमेश्वर सर्जेराव फोपाल (वय 24) आणि पंकज अजबराव इंगळे (वय 28) यांनी बस पार्क करणारे आणि बस धुण्यासाठी गांधीनगर चौकी येथून पाणी घेणारे अरविंद हृदयनारायण गिरी (वय 27) यास बस धुण्यासाठी नेहमी पाणी घेतो म्हणून होळी साजरी करण्यासाठी पैश्याची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी गिरी यांनी पैसे देण्यास विरोध केला असता त्या कारणावरून दारूचे नशेत आरोपी फोपाल याने फिर्यादी यांचे कानास चावा घेवून तुकडा पाडून जखमी केले म्हणून चितळसर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 325,34 प्रमाणे दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Shocking! Refusing to pay money for Holi, taken bite to the ear pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.