शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला, तरुण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 10:53 IST

Crime News: घरगुती वादात समुपदेशनासाठी  गेलेल्या पोलिसांवर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.

लाखांदूर (भंडारा)  : घरगुती वादात समुपदेशनासाठी  गेलेल्या पोलिसांवर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.

विशाल मनोहर तुमाने (३८) रा. विरली बुज. से अटकेतील तरणाचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, तालुक्यातील विरली(बु) येथील बावला हरिदास मोटघरे या वृद्धेने घरगुती वादावरून मुलगा व सुन मारहाण करीत असल्याची माहिती ११२ क्रमांकावर  लाखांदूर पोलिसांना दिली. त्यावरुन आपातकालीन पोलीस वाहनासह पोलीस अंमलदार रवींद्र मडावी व सुभाष शहारे घटनास्थाळी दाखल झाले. वृद्धेच्या कुटुंबियांचे समुपदेशन आटोपून पोलीस वाहनाकडे जात होते. यावेळी विशाल दोन्ही हातात लोखंडी कोयता व चाकू घेवून गावातीलच अन्य एका व्यक्तीला शिविगाळ करुन खून करण्याची धमकी देत होता.

पोलिसांना आढळून आला. त्यावरुन पोलीसांनी आरोपीला हटकले असता पोलिसांना शिवागळ व धक्काबुक्की करत हातातील कोयत्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना महिती दिली. लाखांदूरचे पोलीस निरिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस नाईक दिलीप भोयर, अंमलदार अनिल राठोड, अविनाश खरोले, मुलगिर, भुपेंद्र बावनकूळे आदी पोलिस अधिकारी कर्मचा-यांनी घटनास्थाळी जावून विशालला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र खुनी त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात शिविगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी शिताफीने त्याच्या हातातील लोखंडी हत्यार हस्तगत करीत ताब्यात घेतले.  घटनेची माहिती होताच पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती जाणुन घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस