धक्कादायक! माहीममध्ये सुटकेसमध्ये सापडले पुरुषाचे अवयव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 14:39 IST2019-12-03T13:09:24+5:302019-12-03T14:39:38+5:30
याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! माहीममध्ये सुटकेसमध्ये सापडले पुरुषाचे अवयव
मुंबई - काल सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास माहीम येथे मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठीमागे, समुद्र किनारी एका पुरुषाच्या शरीराचे तुकडे एका सुटकेसमध्ये आढळून आले. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणाची हत्या करून असे शरीराचे तुकडे करून समुद्रात फेकले याबाबत माहिती पोलिसांनी प्राप्त नाही. मात्र, पोलीस त्याचा तपास करत आहेत.
माहीम पश्चिमेकडील दर्ग्यामागील समुद्र किनारी एक सफेद काळ्या रंगाची अमेरिकन टुरिस्टर कंपनीची सुटकेस पाण्यावर तरंगताना मिळून आली. त्यात मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात आणि गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय पंज्यासह आणि काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत कापलेले पुरुषाचे गुप्तांग मिळून आले आहे. पोलिसांनी सापडलेले अवयव सायन हॉस्पिटलमध्ये पाठविले आहेत. या प्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल अज्ञात आरोपींविरोधात दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.