शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

धक्कादायक! मंदिराची जागा हडपण्यासाठी त्यांनी चक्क देवालाच केले मृत घोषित

By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 1:46 PM

Crime News : एका मंदिराची जमीन हडपण्यासाठी चक्क देवालाच मृत घोषित करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

लखनौ - जमीन जुमल्याच्या प्रकरणात, संपत्तीचा ताबा मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मयत घोषित करणारे काही महाभाग तुमच्या माहितीत असतील. पण उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी असलेल्या लखनौमध्ये त्यापेक्षाही धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. येथे एका मंदिराची जमीन हडपण्यासाठी चक्क देवालाच (God) मृत घोषित करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या महाभागांनी सुरुवातीला देवाला मृत घोषित केले. त्यानंतर कागद दाखवून मंदिराची जमीन हडप केली. आता या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर या प्रकरणाचे पितळ उघडे पडले आहे. (They declared God dead in Uttar Pradesh )मिळालेल्या माहितीनुसार मंदिराची जमीन भगवान कृष्ण-राम यांच्या नावे होती. मात्र या दोघांनाही मृत घोषित करून त्यांची जमीन सुरुवातीला खोट्या वडलांच्या नावे केली. त्यानंतर पुन्हा ही जमीन अन्य कुणाच्या तरी नावे करण्यात आली. या अफरातफरीबाबत मंदिराच्या विश्वस्तांची तक्रार नायब तहसीलदारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आली. मात्र तपास सुरू न झाल्याने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले.उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज येथील कुशमोरा हलुवापूरमध्ये एका मंदिराच्या ट्रस्टच्या जागेवरून हा संपूर्ण विवाद झाला आहे. ट्रस्टने दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, मोहनलालगंजमध्ये सर्व्हे नं. १३८, १५९ आणि २१६१ मधील एकूण ०.७३० हेक्टर जमीन कृष्ण-राम यांच्या नावे नोंद आहे.कागदपत्रांमधील नोंदींनुसार हे मंदिर १०० वर्षे जुने आहे. १९८७ मध्ये कृष्ण-राम यांना मृत दाखवून त्यांच्या जागी गयाप्रसाद यांना त्यांचे बनावट वडील म्हणून उभे करण्यात आले. त्यांना कृष्ण-राम यांचे वारस ठरवून ही जमीन त्यांच्या नावावर करण्यात आली होती.हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर १९९१ मध्ये गयाप्रसाद यांनाही मृत दाखवून त्यांचे भाऊ रामनाथ आणि हरिद्वार यांची नावे नोंद करण्यात आली. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर अफरातफर करून ही जमीन हडप करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी